प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स म्हणजे प्रत्येक ज्यांना प्रोजेक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे अशा व्यक्ती. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अशी अधिकारी व्यक्ती खूप महत्वाची असते. अशी व्यक्ती फक्त क्लाएंट असते असे नाही तर ती तुमच्या कंपनीची एखादी उच्च पदावरील व्यक्ती असेल अथवा प्रोजेक्ट साठी काम करणारी एखादी कन्सल्टन्ट अथवा अन्य कोणी. हि एक व्यक्ती किंवा अशा अनेक व्यक्ती तुम्ही संचालित करत असलेल्या प्रोजेक्ट संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेणार असते जसे कि;
१. रिक्वायरमेंट
२. टाइमलाईन
३. कामाचे स्वरूप
४. कॉस्ट
५. मनुष्यबळ
६. तुम्ही केलेले काम योग्य आहे कि अयोग्य
आता अशा अनेक व्यक्ती असतात तेव्हा "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" हा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. या सर्व व्यक्ती आणि त्यांची मते जाणून घेऊन काम करणे हे जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे कोणत्या व्यक्तीस कोणत्या प्रकारचा सर्वोच्च अधिकार आहे हे माहित करून घेणे.
समजा तुमच्या घरी पार्टी आहे आणि पाहुण्यांसाठी तुम्ही एखादा पदार्थ बनवला आणि तो घरातील ४ व्यक्तींना खायला दिला तर जशी तुम्हाला वेगवेगळी प्रतिक्रिया मिळेल जसे कि गोड पदार्थ असेल तर खूपच गोड आहे (डाएट करणारी व्यक्ती ) किंवा थोडी साखर अजून हवी होती (डाएट न करणारी व्यक्ती ) अशा दोन विरुद्ध प्रतिक्रिया तुम्हाला मिळू शकतात. यातील कोणाची प्रतिक्रिया तुम्ही फायनल धराल? ज्या व्यक्तीला स्वयंपाकातील जास्त कळते तिला. बरोबर ना? अगदी तसेच हे आहे.
तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट नेहमी तयार राहील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने प्रोजेक्ट संदर्भात प्रश्न विचारला तर तुम्ही हा रिपोर्ट बघून लगेच उत्तर देऊ शकाल. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी काही ऍप्लिकेशन्स तुम्ही वापरू शकता (Microsoft Project, Asana, Teamwork, ProofHub, Jira, Trello, etc)
प्रोजेक्टचे स्टेटस नेहमी अपडेट करा आणि सगळ्यांबरोबर विशिष्ठ कालावधीनंतर शेअर करीत रहा. तुम्ही स्वतः स्टेटस शेअर केल्याने तुम्हाला तुमची कार्यक्षमता वेगळी सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे तुम्ही प्रोजेक्टमध्ये काही संकटे आली तर आधीच त्यांचा प्रतिकार करण्यास सगळ्यांना बरोबर घेऊन मार्ग काढू शकाल.

No comments:
Post a Comment
Your comments are valuable for me. Thank you for posting it.