Friday, September 11, 2020

फक्त निर्मळ मनाचा...

 

अक्षरांना स्पर्श असावा

मोरपिसाचा, हंसपिसाचा किंवा अगदी राजहंस पिसाचा

 

शब्दांना सुवास असावा

गुलाबाचा, चाफ्याचा किंवा अगदी छोट्याश्या बकुळीचा

 

वाक्यांना निर्बंध असावा

स्वच्छ, सत्शील विचारांचा आणि निर्मळ मनाचा

फक्त निर्मळ मनाचा...

 

© मोहिनीराज भावे

Sunday, August 30, 2020

श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन


नमस्कार! चित्रामृत प्रस्तुत, ‘श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन’ ही मालिका आपल्यापूढे सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत आम्ही आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘वचनामृत’ स्मृती-ग्रंथाचं वाचन सादर करत आहोत.

उपनिषदांमधील अत्युच्च ज्ञानाला प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवता येईल हे आपल्या-सारख्या सामान्य मनुष्यांना शिकवण्यासाठीच भगवंत वारंवार मनुष्यरुपात अवतरीत होत असतात. श्रीरामकृष्णांच जीवन म्हणजे साक्षात ही उपनिषदेच. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या अनंत पैलूचं दर्शन होउ शकतं. ‘वचनामृत’ सारखे ग्रंथ आपल्याला श्रीरामकृष्णांच्या अभूतपूर्व जीवनातील घडामोडींची अगदी जवळून ओळख घडवून आणतात. या ग्रंथाबद्दल खरं म्हणजे जितकं बोलावं तितकं कमीच.

‘महेंद्रनाथ गुप्त’ यांनी श्रीरामकृष्णांशी झालेल्या भेटीना आपल्या दैनंदिनीत शब्दबद्ध केलं. ‘श्री म’ नावानी त्यांनी लिहिलेला मुळ बंगाली ग्रंथ म्हणजे, ‘श्रीश्रीरामकृष्णकथामृत’. पुढे कालांतराने त्याचे विविध भाषांमधे अनुवाद झाले. स्वामी शिवतत्वानंद यांनी मुळ बंगालीवरून केलेला मराठी अनुवाद म्हणजेच ‘श्रीरामकृष्ण वचनामृत’. हा मराठी अनुवाद श्रीरामकृष्ण मठ नागपूर यांच्यातर्फे प्रकाशित झाला आहे. या मालिकेतील वाचनासाठी आम्ही वापरत असलेली आवृत्ती तेरावी असून ती सन २००६ मधे प्रकाशित झाली आहे.

हे वाचन मोहिनीराज भावे यांच्या आवाजात सादर होत आहे. ऐकताना सोपं जावं म्हणून काही किरकोळ बदल केले आहेत. खाली या ग्रंथातील क्रमाप्रमाणे वाचनाच्या ऑडिओ-लिंक्स मांडल्या आहेत. त्या ऐकण्यासाठी त्यावरील ‘प्ले’ बटण दाबा. आम्हाला खात्री आहे की हा उपक्रम आपल्या सर्वांना खूप आवडेल. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

चला तर मग, या मधूर आणि अद्भूत स्मृतीग्रंथाचा आस्वाद घेउया.


श्रीरामकृष्ण वचनामृत

संपूर्ण प्ले-लिस्ट

*दर आठवड्याला नवीन अध्यायांची भर!


अध्याय ००१

प्रथम दर्शन | कर्मत्यागाचा समय (२६ फेब्रुवारी १८८२)




अध्याय ००२- भाग ०१

द्वितीय दर्शन आणि गुरुशिष्य संवाद | गृहस्थ व पित्याचे कर्तव्य (२७ फेब्रुवारी १८८२)




Visit Chitramrit for more details...

Tuesday, June 16, 2020

पालखी

आजच पालखीचे पुण्यात आगमन झाले असते आणि उद्याचा मुक्काम.

मी दर वर्षी, पालखीचे दर्शन घ्यायला फर्ग्युसन रस्त्यावर जातो. लहापणापासूनच तिथे पालखीचे दर्शन घेतले आहे. तुकाराम महाराज पादुका मंदिरासमोर, ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरासमोर आणि शेतकी महाविद्यालय चौक. या भागात प्रचंड उत्साह असतो.

शेतकी महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, बी एम सी सी, मराठवाडा, सिंबायोसिस, या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक असा वर्ग, आणि वडार वाडी, गोखले नगर, पोलीस लाईन, आपटे रोड मॉडेल कॉलनी, अशा भागातला गरीब, उच्चभ्रू वर्ग, सगळे वेगवेगळ्या रंगाचे, रूपाचे, वर्णाचे, जाती धर्माचे तिथे एकत्र येतात.

माझा भाचासुद्धा ३ वर्षाचा असल्यापासून माझ्याबरोबर येतो. आता ६ वर्षाचा आहे.
मी स्वतः ६ वर्षाचा होतो तेव्हापासून पालखीचं दर्शन घेतले आहे.

मागील ३४-३५ वर्षातले हे पहिले वर्ष आहे जेव्हा हा सोहळाच  अनुभवता येणार नाही. घरीच असलो तरी, मन फर्ग्युसन रोड वर आहे. कुठून भीमसेनजींचा आवाज येतोय का ते शोधत आहे. कारण पालखी आणि भीमसेनजींची अभंगवाणी हि खरच अभंग आहे.

उद्या आपल्या सर्वांबरोबरच, पुण्यातील आणि परिसरातील वृत्तपत्राचे कागद, शाई, मशीन सगळेच पालखीची बातमी आणि फोटो यांची वाट पाहत असतील. उद्या त्यांची पाने कोरीच असतील. इतर बातम्या असल्या तरी पालखीची बातमी मात्र हरवलेली असेल. त्यामुळे ती कोरीच नाही का?

पुढच्या दोन दिवसांचे अबाल वृद्धांचे पालखी बरोबरचे, डोक्यावरच्या तुळशीचे, कपाळावर चंदन लावलेले हसरे चेहरे यावर्षी आपापल्या घरीच असतील.

- मोहिनीराज भावे
१६-०६-२०२०

Sunday, June 14, 2020

ना तब मौसम था बारिश का





जो मिला वो समेटते गए
अपना घर बनाते गए


ना तब मौसम था बारिश का
और न हुआ करती थी बेमौसम बारिश



जब बारिश हुई तो पता चला
समेटा था वो मिट्टी थी


स्वभाव था उसका पानी में घुल जाना
घुलना था सो घुल गई, 

पानी के साथ बह गई

बारिश जो थी वो थम गई
उसे जाना था वो चली गई


जाते जाते ले गई
पोटली कुछ सपनोकी और कुछ अरमानों की



हम क्या करते, 
न कोई आसरा था, 

न था कोई सहारा 

जो जाना था वो चला गया
वोभी कहा अपना था


जोभी था वो पराया था
न कुछ लेकर आए थे,
न कुछ लेकर जायेंगे




फिर उठे खड़े हुए
क्या मिलता हैं वो टटोलने लगे


जो मिला वो समेटते गए
अपना घर बनाते गए


ना तब मौसम था बारिश का
और न हुआ करती थी बेमौसम बारिश


- मोहिनीराज भावे