Monday, October 28, 2019

Project Management: Part-02: Initial Preparation

आता तुमच्याकडील कोणत्याही एका प्रोजेक्ट चा विचार करा. जेवढा वेळ हे प्रोजेक्ट पूर्ण करायला लागेल तेवढी उत्कंठा वाढत जाते, खर्च वाढतो, प्लॅनचा अंदाज आणि सत्यता यातला फरक समजायला लागतो, आणि काही वेळा परिश्रम वाया जातात. यालाच 'कोन ऑफ अनसर्टनीटी' (Cone of Uncertainty) म्हणतात.

आता आपण आपल्या हत्तीचेच उदाहरण बघू. अक्खा हत्ती जर आपण मुठीत घ्यायचे  म्हणलो तर शक्य आहे का? नाही ना? मग तसाच अक्खा प्रोजेक्ट एकाच वेळी करायला गेलो तर काय होईल? मुळात आधी हत्तीचा आकार आणि मुठीचा आकार याचा मेळ बसणार नाही आणि नंतर उचलणे तर लांबच राहील.

आता आपण माकडांचे उदाहरण बघू, हि माकडं त्यांच्या आडदांडपणाने एखाद्या फळबागेत घुसतात प्रचंड हैदोस घालतात, फांद्या तोडतात, फळे तोडतात पाने फुले वेळी सगळे काही तोडतात. ती त्यांच्याच मस्तीत असतात. याने होते काय कि बागेचा मालक त्यांना हुसकावून लावतो. पोटात किती जाते?

या उलट पोपट, कोकीळ असे पक्षी फक्त खाण्यालायक फळे खातात. बागेचा मालक असे पक्षी आपल्या बागेत यावेत त्यांनी सुमधुर गुंजन करावे असे म्हणत त्यांना योग्य असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. हे पक्षी कायम फळांचा आस्वाद घेतात कारण ते योग्य तेवढेच घेतात आणि सगळे एकदम खायचा प्रयत्न करीत नाहीत.

आता आपण अजगराच्या खाण्याचा विचार करू. एका वेळेस जो प्राणी समोर येईल तो हळू हळू चावून न खाता तो पूर्ण प्राणी घाई घाईत गिळून टाकतो. आणि मग एकाच जागी सुस्त होऊन पडून राहतो. या सुस्तावलेल्या काळातच त्याच्यावर एखादा दुसरा प्राणी हल्ला करतो आणि हा प्रतिकार न करताच बळी पडतो.

मित्रांनो अगदी तसेच आपण जर क्लाएन्टच्या घाई मुळे किंवा इतर काही कारणामुळे  पूर्ण प्रोजेक्ट एकाच वेळेस करायला गेलो तर आपण तो शेवटी घाई गडबडीत पूर्ण करतो. यामुळे होते काय कि झालेल्या चुका पुढे आपण काही दिवस निस्तरत बसतो आणि क्लाएन्टच्या किंवा इतरांच्या आरोपांचे बळी ठरतो. प्रोजेक्ट एक तर आपल्या हातून जाते नाहीतर कंपनीच्या. त्यामुळे आपण थोडे थोडे खाल्ले पाहिजे. प्रोजेक्टच्या प्रत्येक पायरीचा विचार करायला हवा, उपलब्ध टीमच्या कौशल्यांचा विचार करायला हवा, उपलब्ध आर्थिक स्रोतांचा विचार करायला हवा आणि मग प्रोजेक्टची नीट आखणी / मांडणी करून तू सुरु करायला हवा. यात आधी थोडा वेळ जाईल पण योग्य आखणी आणि प्रत्येक पायरी पूर्ण झाल्यावर क्लाएंट बरोबर शेअर केल्यास सगळेच आनंदी राहतील. यात मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे दार काही दिवसांनी या आराखड्याचा रिव्ह्यू. 

Project Management: Part-01: Introduction



मित्रांनो, नमस्कार!
प्रोजेक्ट प्लँनिंग (Project Planning) म्हणजे खरंतर एक सोपी गोष्ट. हो खरंच सोप्प आहे. तुम्ही अनेकदा वॉटरफ़ॉल मॉडेल (waterfall ), कायझन (kaizen ), अजाईल (agile), इत्यादी शब्द ऐकले असतील. त्यातूनच या सर्व प्रकारचे सर्टिफिकेशन आणि त्यांची क्लिष्टता, त्यासाठीचे मापदंड, मोठाल्या फीज हे ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. हो खरंच हे सर्व अवघड आहे. पण मग मी सोपं का म्हणतोय? कारण शेवटी या सगळ्या मधल्या थिअरीज आपल्याला आपल्याच कामात वापरायच्या आहेत. आपलं काम जर आपल्याला नीट येत असेल म्हणजे आपल्या प्रत्येकाला बरं का. तर आपल्या टीमला जर आपापलं काम नीट येत असेल तर या सर्व थिअरीज एकदम सोप्प्या आहेत. म्हणजे प्रोजेक्ट प्लँनिंग एकदम सोप्प आहे. अजूनही अवघड वाटत आहे?
चला आपण हे मिळून सोप्प करूया. आपण काही आपल्याला उपयुक्त अशा गोष्टी सिरीज मध्ये करणार आहोत. एकदम नाही हं. कारण प्लँनिंग मधल्या अनेक संकल्पना मिळून एक हत्ती आहे. आता खराखुरा हत्ती कोणी अक्खा मुठीत घेऊ शकेल का? नाही ना ? आपणही तसेच या हत्तीच्या कधी सोंडेला स्पर्श करू तर कधी कानाला. असे करत आपण हा संपूर्ण हत्ती जाणून घेणार आहोत. जेवढे जाणून घेऊ तेवढे थोडेच.



Hello Friends,
Project planning is a simple thing! What? Do you think it's not? It's truly easy. Why am I saying so?

You must have heard about the waterfall model, kaizen, agile, etc. You must have also heard about PMP, Agile, etc project management certifications along with their measurement systems, fees for courses or certifications, credit systems. Or you have experienced it? hmm! then project management or planning is really difficult.

Then why I am saying it's easy? Am.. because all these are theories/practices/processes, we will be using in our work which we are doing regularly. If we know our work exactly ("we" mean the team) then these theories are easy.

Let's make it easy together. We will be doing some useful things in this series...no no not only one.. we will do many things. Why? because many concepts together become a huge elephant. So, can you grab an elephant by your hand? definitely no. We will touch its different body parts one by one.
So let's start...