Tuesday, November 27, 2012

मी एक विसरभोळा


मी एक विसरभोळा
स्मृती माझ्या होतात गोळा.
मी एक विसरभोळा
स्मृती माझ्या होतात गोळा.
अन् मग...
बेरजेचीही होते वजाबाकी
गुणाकारातही राहते बाकी.

ठरवतो मी हे काम करुया 
उद्या सकाळी वाजले की आठ
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आठवते 
सकाळी वाजले होते की आठ

दुसऱ्यांना मी देतो भेटण्यासाठी वेळा
उशीरच होतो तिथेही अनेक वेळा

मनात अनेकदा येतो विचारांचा धांडोळा
थोड्याच वेळात होतो त्यांचा बोळा

ठरविले मी आज 
लिहून ठेवायचे सारे कामकाज
दुकानात गेलो वही घेतली पेन घेतले
दुकानदार म्हणाला "काय विशेष आज"
त्याला म्हणालो "बाबा लिहून ठेवायचे सारे काज
ठरविले आहे आज"

घरी गेलो वही काढली पेन घेतले
आणि विचार केला 
यावर मी पैसे का बरे ओतले?

मी एक विसरभोळा
स्मृती माझ्या होतात गोळा.

No comments: