Tuesday, January 1, 2008

॥ श्री मोहिनीराज ॥

समुद्रमंथनाच्या नंतर समुद्रातून चौदा रत्ने निघाली. त्यांतील अमृतासाठी देव आणि दैत्य यांच्यात वाद उत्पंन्न झाला. वाद मिटत नाही असे दिसून येताच देवांनी श्री विष्णूंना वाद मिटविण्याची विनंती केली. दैत्य हे विषयलोलुप, त्यांच्या या वृत्तीचा फायदा घेण्याचे श्री विष्णूंनी ठरवीले. श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले. सर्व देवांना त्यांनी अमृत वाटले आणि दैत्य फक्त मोहिनी कडेच बघत बसले. मोहिनी वर भाळून दैत्य अमृतास मुकले. राहूने चुकून अमृत प्राशन केले, पण श्री विष्णूंनी त्याचा शिरच्छेद केला. श्री विष्णूंनी घेतलेल्या या मोहिनी अवतारामुळे त्यांचे नाव मोहिनीराज असे प्रचलीत झाले. याच अवताराला कोणी अर्धनारी नटेश्वरही म्हणतात. नेवासे गावात श्री मोहिनीराजाचे मंदीर आहे.




No comments: